Vidyabharti Sanstha's, Wardha

Dr. R. G. Bhoyar Arts, Comm. & Sci. College, Seloo (Vidyabharti College)

Accredited 'B+' Grade by NAAC

(Recognized by UGC, New Delhi under section 2(f) & 12(B) as per Act 1956)

Approved by Govt. of Maharashtra Affiliated to R. T. M. Nagpur University, Nagpur


College Event


Dr. R. G. Bhoyar ACS College, Seloo

Nagpur - Wardha Highway, Seloo
Maharashtra, India

Mobile: +91 9822836070, +91 9834609527


Academic Session: 2025-26

INTER COLLIGIATE MENS KABADDI TOURNAMENT

दिनांक 20-9-2025 रोजी डॉ.आर.जी. भोयर कला,  वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सेलू आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने E-Zone कबड्डीच्या स्पर्धा डॉ. आर.जी. भोयर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सेलू येथे, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याद्वारे आयोजित करण्यात आल्या.  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असलेले महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य डॉ. राम पंचारिया यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. राम पंचारीया  यांनी कबड्डी सामन्याचे उद्घाटन केले. मोठ्या संख्येने सहभागी खेळाडू विद्यार्थी तसेच विविध महाविद्यालयाचे क्रीडा निदेशक, प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते एकूण 15 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अंतिम सामना ज्ञान भारती महाविद्यालय, देवळी आणि आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आष्टी यांच्यामध्ये झाला. यामध्ये ज्ञान भारती महाविद्यालय देवळी हा संघ विजयी झाला.बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. राम पंचारिया यांनी सर्वप्रथम दोन्ही संघांचे अभिनंदन केले ते म्हणाले  "अशा प्रकारच्या स्पर्धांचे वारंवार आयोजन केल्याने, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व सांघिक भावना निर्माण होऊन एकात्मता निर्माण होते". सन्माननीय प्राचार्य डॉ. राम पंचारिया यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून विजयी व उपविजयी संघांना गौरविण्यात आले, सर्व उपस्थितांचे आभार महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक निदेशक डॉ. शशांक निकम यांनी मानले स्पर्धच्या यशस्वी ते करिता सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी विद्यार्थी पालक तसेच गावातील सन्माननीय व्यक्ती यांनी भाग घेऊन स्पर्धांच्या यशस्वी ते करिता मोलाचा सहभाग नोंदविला. शारीरिक शिक्षण विभाग या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित होता.


Event Date: Saturday, September 20, 2025


     Check here All Events... :
 
 

 

Vidyabharti College, Seloo @