Nagpur - Wardha Highway, Seloo
Maharashtra, India
Mobile: +91 9822836070, +91 9834609527
जिल्हा सामान्य रुग्णालय ,वर्धा येथील जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभाग व डॉ आर जी भोयर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माहिती,शिक्षण व संवादावर आधारित तीव्र रोग जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला .याकार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष म्हणून डॉ सिद्धार्थ नागदिवे विभाग प्रमुख वाणिज्य विभाग यांची तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ अमित छलानी समुपदेशक जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ वैभव पिंपळे यांची उपस्थिती लाभली.त्याच प्रमाणे कार्यक्रम संयोजक म्हणून डॉ अभिजित पाटील कार्यक्रमाधिकारी रा.से.यो.,प्रा सतीश मनवर सह कार्यक्रमाधिकारी रा.से.यो.यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा सतीश मनावर यांनी कार्यक्रम आयोजनाची भूमिका विशद करतांनाच महत्त्व प्रतिपादन केले.यानंतर प्रमुख अतिथींनी एड्स रोगा वर प्रकाश टाकून त्याच्या कारणाविषयी माहिती दिली.तसेच स्त्री व पुरुषांच्या संदर्भातील तीव्र रोगांविषयी माहिती देऊन उपायांवर प्रकाश टाकला.तसेच याप्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष डॉ सिद्धार्थ नागदिवे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आव्हान केले की मिळालेली माहिती फार उपयुक्त व मौलिक असून या माहिती रुपी ज्ञानाच्या आधारे नकळत होणाऱ्या तीव्र रोगांपासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अभिजित नाना पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ वैभव पिंपळे यांनी मानले.कार्यक्रमाला विध्यार्थी व प्राध्यापक वृंदाची उपस्थिती लाभली.