Vidyabharti Sanstha's, Wardha

Dr. R. G. Bhoyar Arts, Comm. & Sci. College, Seloo (Vidyabharti College)

Accredited 'B+' Grade by NAAC

(Recognized by UGC, New Delhi under section 2(f) & 12(B) as per Act 1956)

Approved by Govt. of Maharashtra Affiliated to R. T. M. Nagpur University, Nagpur


College Event


Dr. R. G. Bhoyar ACS College, Seloo

Nagpur - Wardha Highway, Seloo
Maharashtra, India

Mobile: +91 9822836070, +91 9834609527


Academic Session: 2025-26

WORKSHP ON PROJECT REPORT WRITTING

डॉ. आर. जी. भोयार आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, सेलू येथे “प्रोजेक्ट रिपोर्ट लेखन” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. एम.बी.ए. व एम.कॉम. विद्यार्थ्यांसाठी आयोजित या कार्यशाळेत संशोधन पद्धती, सिनॉप्सिस लेखन व प्रोजेक्ट रिपोर्ट लेखन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी एकूण ५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम ओ. पंचारिया होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. आशिष लिंगे (सेशन एक्स्पर्ट) यांनी विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना आवश्यक असलेल्या बाबी, संशोधनाची अचूक पद्धत व लेखनातील शिस्त याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

या प्रसंगी प्रा. दिपाली काळे व प्रा. पंकज राठी यांचीही उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध शंका उपस्थित केल्या, ज्यांचे निरसन तज्ज्ञांकडून करण्यात आले.

कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन व लेखन कौशल्यात वाढ होईल, असा विश्वास प्राचार्यांनी व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.


Event Date: Friday, March 20, 2026


     Check here All Events... :
 
 

 

Vidyabharti College, Seloo @