Vidyabharti Sanstha's, Wardha

Dr. R. G. Bhoyar Arts, Comm. & Sci. College, Seloo (Vidyabharti College)

Accredited 'B+' Grade by NAAC

(Recognized by UGC, New Delhi under section 2(f) & 12(B) as per Act 1956)

Approved by Govt. of Maharashtra Affiliated to R. T. M. Nagpur University, Nagpur


College Event


Dr. R. G. Bhoyar ACS College, Seloo

Nagpur - Wardha Highway, Seloo
Maharashtra, India

Mobile: +91 9822836070, +91 9834609527


Academic Session: 2026-27

प्लेसमेंट ड्रì

सेलू : डॉ. आर. जी. भोयर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेलू तसेच ग्लोबल रिक्रूटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि महिंद्रा फायनान्स या नामांकित वित्तीय संस्थांमधील विविध पदांच्या भरतीसाठी भव्य प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले.

या प्लेसमेंट ड्राइव्हच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम पंचारिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील रोजगाराच्या विविध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. वसीम खान हे उपस्थित होते.  प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. वैशाली बडवाईक यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेसोबतच संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करून करिअरच्या संधींचे सोने करावे, असे प्रतिपादन केले

यावेळी ग्लोबल रिक्रूटर्सचे संचालक श्री. अजय विश्वकर्मा उपस्थित होते. तसेच ग्लोबल रिक्रूटर्सचे एच.आर. प्रतिनिधी सौरभ नेऊळकर, प्राची कांडलकर आणि हर्ष ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना भरती प्रक्रिया, विविध पदांसाठी आवश्यक पात्रता व निवड प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले.

सदर प्लेसमेंट ड्राइव्हच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. क्षमा मुरारकर, प्रा. अनुराग खुपट, डॉ. शशांक निकम, डॉ. किशोर डंभारे आणि प्रा. सुरज अडोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्लेसमेंट ड्राइव्हसाठी एकूण १८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांना नामांकित बँकिंग व वित्तीय संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाने केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.


Event Date: Tuesday, November 3, 2026


     Check here All Events... :
 
 

 

Vidyabharti College, Seloo @